
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
खालसा हेल्प फाउंडेशनच्या वतीने दिनांक ११ मे २०२६ रोजी पहिल्या टप्प्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. संस्थेच्या विस्तार आणि सेवा कार्याला अधिक गती देण्यासाठी विदर्भ व जिल्हास्तरावर नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये स. बलबीर सिंह गुरो यांची विदर्भ अध्यक्षपदी, स. पुरण सिंग जुनेजा यांची चंद्रपूर शहर अध्यक्षपदी, स. गुरजीत सिंग गढोक यांची युवा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच स. नितुसिंग बावरे यांच्याकडे सिगलिगर सिख सेल युवा विदर्भ अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय स. गुरप्रीत सिंग सचदेव यांची गडचांदूर शहर अध्यक्षपदी, स. हरभजन सिंग भट्टी यांची राजुरा शहर अध्यक्षपदी, तर दीपक अनेजा यांची घुग्घुस शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. स. हरदीप सिंग सहानी यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून विदर्भ सचिवपदाची धुरा सोनू अनेजा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
खालसा हेल्प फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष स. गुरप्रीतसिंग रम्मी यांच्या आदेशानुसार, जिल्हा प्रमुख स. तेजिंदर सिंह दारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अर्जुनसिंग धुन्ना यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.
दरम्यान, येत्या ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता प्रियदर्शिनी हॉल, चंद्रपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष गुरप्रीत सिंग रम्मी यांच्या उपस्थितीत खालसा हेल्प फाउंडेशनच्या वतीने काही महत्त्वपूर्ण आणि सेवाभावी निर्णयांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

