तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूची उत्कृष्ट कामगिरी
दूसरी जैन चैलेंज ट्रॉफी तायक्वांदो टूर्नामेंट स्पर्धेत रावेरचे यश
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल शिरसोली रोड जळगाव येथे 01/02/2025 ते 02/02/2025 रोजी पार पडल्या स्पर्धेमध्ये रावेत तायक्वांदो अकॅडमी येथील खेळाडू उत्कृष्ट अशी कामगिरी करत रावेर तालुक्याला एकूण 17(सुवर्ण) गोल्ड 17 (रोप्य) सिल्वर व 26 (कांस्य) ब्रांस पदक प्राप्त केले. मुलांमध्ये द्वितीय चषक आणि तृतीय चषक व मुलींमध्ये द्वितीय चषक तर पुमसे प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला या यशामध्ये त्यांना प्रशिक्षक जीवन महाजन, जयेश कासार, स्नेहल अट्रवलकर, सहप्रशिक्षक नमिता सुरवाडे, शिक्षक विष्णू चारण, मानसी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच जळगाव जिल्हा तायक्वांदो सचिव अजित घारगे, जयेश बाविस्कर, गिरीश खोडके, निकेतन खोडके, पुष्पक महाजन, दानिश तडवी, विष्णू झाल्टे यांनी स्पर्धेचे आयोजन केले व स्पर्धेला पंचप्रमुख म्हणून स्मिता काटकर. रोहन लोणारी, निलेश पाटील यांनी कामकाज पाहिले. उत्कृष्ट कामगिरी करिता स्वामी शाळेचे अध्यक्ष रवींद्र पवार, मातोश्री शाळेचे अध्यक्ष अमित समर्थ, रावेर ता तायक्वांदो असो अध्यक्ष दीपक नगरे, डॉ. संदीप पाटील, डॉ. सुरेश महाजन, आयुष अग्रवाल, युवराज माळी, श्रीकांत महाजन यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.