Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्तीकरणासाठी सर्वांची भावना एकच!
    राजकारण

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्तीकरणासाठी सर्वांची भावना एकच!

    अनिल चौधरी यांना प्रतिसाद : वरणगावात घेतली नगरसेवकांची भेट
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 14, 2026No Comments131 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांनी वरणगाव येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे तसेच विविध पक्षांच्या नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच अपक्ष गटातील एकूण 17 नगरसेवक उपस्थित होते. बैठकीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांपुढील विविध प्रश्न, शहर विकास, नागरी सुविधांचा विस्तार तसेच आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, विकासकामांना गती आणि लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांबाबत सकारात्मक वातावरणात विचारविनिमय झाला.

    यावेळी बोलताना अनिल चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभावी आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. वरणगाव येथील नगराध्यक्ष सुनील काळे तसेच सर्व नगरसेवकांनी दिलेल्या सन्मान, आत्मीयता आणि शुभेच्छांबद्दल अनिल चौधरी यांनी आभार व्यक्त केले. बैठकीस विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    राहुल गांधी यांनी चर्चेपासून पळू नये : भाजपची मागणी

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif