Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»सत्ताधारी नगरसेवकालाही आंदोलन करावे लागले!
    संपादकीय

    सत्ताधारी नगरसेवकालाही आंदोलन करावे लागले!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 21, 2026No Comments9 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    जळगाव महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना यांची थम्पिंग मेजॉरिटी असताना प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवक आपल्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेसमोर उपोषण आंदोलन करत आहेत. महानगरपालिका निवडणुका होऊन आठ महिने झाले. नवीन सत्ताधारी भाजप-सेनेचे म्हणजे महायुतीचे मंडळ अस्तित्वात आले; परंतु गेल्या काही महिन्यांपासून पिण्याचे पाणी, तुंबलेल्या गटारी, आरोग्याच्या असुविधा यासाठी प्रभाग क्रमांक दोनमधील कलानगर या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

    उन्हाळ्यात रेल्वे क्रॉसिंग करून पिण्याचे पाणी आणावे लागते. पावसाळ्यात लाईटची बोंबाबोंब असल्याने जीव मुठीत धरून पाण्याला जावे लागते. कारण या ठिकाणी मोठे-मोठे सर्प असतात. ते केव्हा आणि कोणाला दंश करतील, हे सांगता येत नाही. स्वतःच्या हातातील लाईट घेऊन पाणी आणावे लागते. गटारी तुंबल्यामुळे मच्छरांचा फार मोठा त्रास येथील लोक सहन करत आहेत.

    या सर्व मागण्यांसाठी या प्रभागातील नगरसेवक विजय बांदल यांनी गेल्या आठ महिन्यांत प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली आहेत. त्याची पोचपावती त्यांनी घेतलेली आहे; पण प्रशासनाला त्याचे काही एक सोयरसुतक नाही. गेल्या आठ महिन्यांत एकाही बाबतीत आयुक्त अथवा इतर अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. शेवटी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सुख-सोयींसाठी विजय बांदल यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला.

    महानगरपालिकेत सत्ता महायुतीची आहे. महापौर भाजपचा तर उपमहापौर शिवसेनेचा आहे; पण भाजपच्या नगरसेवकांची दखल घेतो कोण, म्हणून त्याला उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026

    जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

    September 13, 2026

    एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif