Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    • भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
    • युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार
    • शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»दीड महिन्यात न्यायालयीन आदेशानंतरही पोलिसांनी चौकशी नाहीच
    राजकारण

    दीड महिन्यात न्यायालयीन आदेशानंतरही पोलिसांनी चौकशी नाहीच

    आता प्रशांत आंबी यांनी घेतला मोठा निर्णय : पोस्ट चर्चेत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 10, 2026No Comments134 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड धमकी प्रकरणात कोल्हापूर सर्किट बेंच आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रकाशक प्रशांत आंबी यांनी नाराजी दर्शवली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईला गती मिळत नसल्याने नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचा खटला आता जिल्हा सत्र न्यायालयात चालणार आहे.

    मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुरू असलेला खटला विड्रॉल करण्याच्या सर्किट बेंचकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचने घेतलेल्या भूमिकेबद्दल आंबी कुटुंबीयांची नाराजी दर्शवली आहे. संजय गायकवाड यांच्या चौकशीला जिल्हा सत्र न्यायालयाने परवानगी देऊनही अद्याप त्यांना चौकशीसाठी बोलावलं नसल्याचा दावा प्रशांत आंबी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केला आहे.

    कोल्हापूर सर्किट बेंचच्या भूमिकेनंतर आंबी यांनी आता जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आंबी कुटुंबीयांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती.

    या संपूर्ण प्रकरणावर प्रशांत आंबी म्हणाले, आम्ही जिल्हा न्यायालयात येत्या दोन-तीन दिवसांत खटला दाखल करत आहोत. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केलेली नाही. ज्याच्यावर अन्याय झाला, त्याच्या बाजूने पोलिसांनी राहायला हवं. पण माझ्या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलीस हे आरोपींच्या बाजूने राहिले आहेत. त्यामुळे दीड महिन्यात न्यायालयाने आदेश देऊनही पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. गरीबाला वेगळा न्याय आहे. तर श्रीमंताला वेगळा न्याय आहे. ज्याची सत्ता आहे, त्याला वेगळा न्याय आहे. ज्याची सत्ता नाही, त्याला वेगळा न्याय आहे. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढाई लढत राहू, असा निश्चय सुरुवातीपासूनच केला आहे’.

    प्रशांत आंबी यांची पोस्ट

    प्रशांत आंबी यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ‘शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून मध्यरात्री मला फोन करून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, महामानवांच्या नावावरून शिवीगाळ, रोज 100 पुरुष घरी येतील अशी माझ्या कुटुंबाला बलात्काराची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हायकोर्टात आम्ही रीटपिटीशन दाखल केली होती. ती आमच्या वकिलांना Withdraw करायचा सल्ला हायकोर्टाने दिलाय. आमदार संजय गायकवाड यांच्यावर त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल दखलपात्र गुन्हा नोंदवावा, एवढीच आमची मागणी होती. हायकोर्ट आमचा आवाज ऐकेल, असं वाटलं होतं. पण त्यांनी प्रक्रियावादी निर्णय दिला आहे’.

    ‘गायकवाड यांनी केलेल्या फोननंतर सुद्धा मला अनेक धमक्यांचे फोन आलेले होते. प्रशांत आंबीला पाकिस्तान-चीनमधून फंडिंग येतं. त्याची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. तो नक्षलवादी आहे, राष्ट्रद्रोही आहे, विकृत प्रकाशक आहे, अशा पद्धतीची बदनामी आमदार गायकवाड आणि त्यांचे समर्थक करत आहेत. माझी चूक काय? तर मी फक्त अन्यायाविरोधात लढतोय. जिल्हा न्यायालयाने चौकशीची परवानगी देऊनसुद्धा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. लढाई सुरु राहील, असेही त्यांनी नमूद केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026

    महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा

    September 6, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif