चोरट्यांनी साधला अक्षय तृतीयेचा मुहूर्त

लंपास केले पुजेच्या चांदीच्या वस्तू

0

 

 

 

चोरट्यांनी साधला अक्षय तृतीयेचा मुहूर्त

 

लंपास केले पुजेच्या चांदीच्या वस्तू

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एरंडोल येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी भल्या पहाटे सरस्वती काॅलनीमधील महिला कोकीळाताई दिगंबर पाटील हे घराला कुलूप लावून अक्षय तृतीयेनिमित्त बाहेरगावी गेल्या असता त्यांच्या निवासस्थानाचे गेट व दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली.

१ किलो चांदीचे ताट, २ चांदीचे ग्लास,२ चांदीच्या ताटल्या, २ चांदीच्या मुर्त्या, चांदीच्या आरत्या इत्यादी पुजेच्या वस्तू व ६ ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केले. याबाबत ३० एप्रिल २०२५ रोजी बुधवारी रात्री उशिरापर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचांदीचे दागिने खरेदी करतात. मात्र सरस्वती काॅलनीमधील चोरीच्या घटनेत चोराने चांदीच्या वस्तू व सोन्याचे दागिन्यांची चोरी करून मुहूर्त साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.