एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील नगरपालिकेने २०२३-२४ पासून १५% कर व न.पा. हद्दीतील खरेदी विक्री वरील विकास कर हे रद्द करावेत.या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष गोरख चौधरी यांच्या २६ ऑगस्ट २०२४ सोमवार पासून न.पा.कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणास आरंभ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष अमित पाटील, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, डॉ. सुरेश पाटील व इतर कार्यकर्त्यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन गोरख चौधरी यांना पाठींबा दिला.
एरंडोल नगरपालिकेने २०२३-२४ मध्ये केलेल्या वाढीव घरपट्टीचे १५% रक्कम शहरवासीयांना परत करण्यात यावी.अशीही मागणी उपोषणकर्ते गोरख चौधरी यांनी केली आहे.२०२३ -२४ मध्ये केलेल्या १५% घरपट्टीवर स्थगिती मिळावी, खरेदी विक्री वर लावलेला १% विकास कर रद्द करावा.अशा प्रमुख मागण्या गोरख चौधरी यांनी केलेल्या असून एरंडोल वासियांवर या प्रकरणी झालेल्या अन्याया विरोधात त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.पहिल्या दिवशी त्यांच्याशी चर्चा करायला कुणीही आले नाही,असे सांगण्यात आले.
एरंडोल व पारोळा या दोन्ही शहरांत एकाच दिवशी नगरपालिका घरपट्टी वाढ जाहीर करण्यात आली.आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा येथील कर वसूलीला तात्काळ स्थगिती आणली.मात्र एरंडोल येथे वाढीव १५% वसुली करण्यात आली.हा एरंडोलकरांवरचा राग आहे की दुजाभाव असा आरोप गोरख चौधरी यांनी निवेदनाद्वारे केला आहे.