अल्पवयीन विद्यार्थीनींची छेडखानी.. शिक्षक जेरबंद

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अल्पवयीन विद्यार्थीनीच्या छेडखानी प्रकरणी माध्यमिक शिक्षक आरोपी मंगेश हरी पाटील (वय ५५) यास एरंडोल पोलीस पथकाने सापळा रचून छत्रपती संभाजीनगर येथे सिडको परिसरात एका चहाच्या टपरीवर आरोपी बसलेला असतांना त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी आरोपी मंगेश पाटील याने पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने त्याला १४ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला एरंडोल पोलीस स्टेशनला आणून रात्री ८ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली.

एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश पाटील, पोलीस हवालदार महेंद्रसिगं पाटील व लक्ष्मण पाटील हे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले. आरोपी मंगेश पाटील हा बीड रस्त्यावरील चहाच्या टपरीवर बसलेला असतांना पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

तत्पुर्वी त्याने पलायन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु पथकाच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. ही कारवाई शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली. त्यानंतर सहाय्यक फौजदार राजेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीला एरंडोल पोलीस स्टेशनला आणून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यास अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.