Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»एरंडोल तालुक्यातील 1480 शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित
    कृषी

    एरंडोल तालुक्यातील 1480 शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 10, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी ठिबक तुषार सिंचन योजना ही राबविण्यात येते. यात एरंडोल तालुक्यातील 1480 शेतकऱ्यांचे गेल्या 2023/24 या वर्षाचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदान रखडले असल्याने तालुक्यातील शेतकरी हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करताना दिसून येत आहे.

    पाण्याचा होणारा अतिवापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून शेतीचा विकास साधण्यासाठी शासनातर्फे ठिबक तुषार सिंचन योजना राबविण्यात येत आहे. यामुळे अतिउष्णतेमुळे उन्हाळ्यात पिकांना या योजनेमुळे आवश्यकतेनुसार पाणी देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकाचा फायदा मिळत असतो.  मात्र गेल्या वर्षभरापासून तुषार सिंचन योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण होत आहे.

    तुषार सिंचन योजना 80 टक्के अनुदान शासनातर्फे देण्यात येते. यामुळे शेतकरी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेत असून पाण्याचा होणारा अपव्यय कमी होऊन पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी ठिबक योजना कार्यान्वित केली गेली आहे. मात्र अर्ज करून देखील योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.

    ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अनुदानाची रक्कम वेळेत मिळाल्यास शेतकरी अधिक संख्येने या योजनेकडे वळू शकतात. मात्र तसे अद्यापही होताना दिसून येत नाही.  अनुदानाची रक्कम वेळेवर जमा करण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी यासाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून सदर योजनेची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    एरंडोल तालुक्यातून 1942 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात केवळ 450 शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान गेल्या दीड वर्षापासून मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिन झाल्याचे दिसून येत आहे. एरंडोल तालुका हा बागायती कपाशी व मक्याचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असून यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेअंतर्गत अर्ज दाखल केले आहेत. मात्र गेल्या वर्षाच्या शेतकऱ्यांना अद्याप पावतो कुठलीही अनुदानाची रक्कम मिळालेली नसून शेतकरी राजा हा हवालदील झालेला दिसून येत आहे.  तरी आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन स्तरावर रेटा लावून सिंचन अनुदान शेतकऱ्यांना मिळवून द्यावे अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    #erandol Thibak Anudan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif