एरंडोल येथे एसटी कर्मचाऱ्यांचे भिक मांगो आंदोलन

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

३ महिन्यांपासून एसटीचे राज्यव्यापी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी भिक मांगो आंदोलन केले. आंदोलनाआधी कर्मचाऱ्यांनी शासकीय ध्वजारोहणास उपस्थिती दिली. यावेळी आ. चिमणराव पाटील यांची भेट घेऊन विलीनीकरणाच्या मागणीला पाठींबा द्यावा अशी विनंती केली. या भिक मांगो आंदोलनास बसस्थानकापासून सुरुवात झाली.

संपकरी कर्मचाऱ्यांना आपला प्रपंचिक गाडा ओढणे जिकीरीचे झाले आहे. म्हणून त्यांनी हे आंदोलन छेडले. सुरूवातीलाच एका प्रवाशाने त्यांच्या झोळीत २०० रूपये टाकले. नंतर बसस्थानकामागील रस्त्याने जाऊन संपकरी कर्मचारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. तेथे त्यांनी पुतळ्यास माल्यार्पण केले. या आंदोलनात एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबल्यामुळे एसटीचे हालच हाल सुरू आहेत. त्यात प्रवासी बेहाल असे चित्र एकंदरीत दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.