एरंडोलात अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला !

0

एरंडोल , लोकशाही न्यूज नेटवर्क
एरंडोल येथील मेन रोड वरील गुरुवारी रात्री माऊली ज्वेलर्स या दुकानात चोरी करून सोने व चांदीच्या ऐवज लुटून नेला. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी आपला थांग पत्ता लागू नये म्हणून दुकानात प्रवेश करताना दुकानाचे लाईट कनेक्शन बंद करून आत प्रवेश केला. चोरीमुळे एरंडोल शहरातील सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे .

प्रसाद अजय वाघ व सिद्धार्थ अजय वाघ या भावंडांचे माऊली ज्वेलर्स या नावाने मेन रोड परिसरात दुकान असून प्रसाद अजय वाघ हे कुटुंबासोबत ७ मार्च 2023 रोजी नाशिक येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. १० मार्च 2023 रोजी प्रसाद वाघ नाशिकहून घरी आल्यावर दुकानाकडे गेले असता ते बंद स्थितीत होते. 11 मार्च 2023 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना भगवान चौधरी यांनी फोन करून कळविले की तुमच्या दुकानाचे शटर उघडे आहे . त्यावेळी प्रसाद वाघ व त्यांचे भाऊ सिद्धार्थ वाघ हे दुकानाकडे गेले असता दुकानाचे शटर वाकलेले आढळून आल्याने दुकानात चोरी झाल्याचे संशय आल्याने त्यांनी लगेच एरंडोल पोलीस स्टेशनला कळवले . पोलिसांसोबत दुकानात प्रवेश केला असता कस्टमरचे ऑर्डर प्रमाणे पन्नास हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपये किमतीची पॉलिश केलेल्या सोन्याचे दागिने ,एक लाख दहा हजार किमतीच्या सोन्याच्या फुल्या व पन्नास हजार किमतीचे चांदीचे भांडे कडे व मोड असा एकूण दोन लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला.
सदर घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील, अकिल मुजावर, अनिल पाटील हे करीत आहे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here