‘त्या’ तरूणाचा खून करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल येथे शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तरूणाचा खून करणाऱ्या दोन चुतल्यांसह इतर पाच जणांवर एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आबा भगवान महाजन हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह एरंडोल शहरातील मारोती मढी येथे राहतात. त्यांना सुरेश, तुकाराम आणि मगन असे तीन भाऊ आहे. त्यांच्या आईच्या हिस्स्याचे शेत जो मुलगा करेल तो मुलगा त्यांना वर्षांला १५ हजार रूपये देईल असे ठरविण्यात आले होते. दरम्यान यावर्षी याच शेताच्या वादातून आबा महाजन यांचे इतर तिन भाऊ सुरेश, तुकाराम आणि मगन यांच्याशी गुरूवार १२ मे रोजी सकाळी ७ वाजता वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

आबा महाजन यांना मारहाण करत असल्याचे पाहून त्यांचा मोठा मुलगा उमेश हा तिथे आला. याचा राग आल्याने सुरेश महाजन, तुकाराम महाजन, मगन महाजन, तुकारामचा मुलगा मनोज आणि पत्नी उषा बाई आणि इतरांना आबा महाजन आणि उमेश महाजन यांना बेदम मारहाण केली. तर उमेशला गुप्तांगावर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी जळगाव येथे जाण्याचा सल्ला दिला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

दरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. जोपर्यंत गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयताचा भाऊ निलेश याने घेतला होता. मयताची आई सुनिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेठ तुकाराम भगवान महाजन, पुतण्या मनोज तुकाराम महाजन, जेठ सुरेश भगवान महाजन, पुतण्या अनिल सुरेश महाजन, जेठाणी उषाबाई तुकाराम महाजन सर्व रा. एरंडोल यांच्याविरोधात एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.