विजेचा धक्का लागल्याने वृद्ध ठार !
एरंडोल I लोकशाही न्यूज नेटवर्क
झाडाच्या फांद्या विळ्याने तोडत असतांना विळ्याचा स्पर्श विद्युत तारांना लागल्याने एका ७८ वर्षीय वृद्धाचा चिजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील गजमल नगरात ३० रोजी घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली . इब्राहिम उमर पिंजारी वय ७८ वर्ष असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
पिंजारी हे गजमल नगरामधील शिरसाठ नावाच्या शिक्षकाकडे जवळपास दोन महिन्यांपासून हात मजुरीने काम करीत होते. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पिंजारी हे शिरसाठ यांच्या घरासमोरील झाडाच्या फांद्या तोडत असताना. लोखंडी विळा लागल्याने त्यांना विजेचा शॉक लागून यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

