Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»खुशखबर.. एटीएममधून PF रक्कम काढता येणार !
    राष्ट्रीय

    खुशखबर.. एटीएममधून PF रक्कम काढता येणार !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. ती रक्कम कर्मचाऱ्याला रक्कम भविष्यात विविध कारणांसाठी कामी येते. ईपीएफओ पीएफधारकांना चांगल्या सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी आग्रही असते. त्यानुसार ईपीएफओकडून अनेकदा आवश्यक बदल करण्यात आले आहेत. पीएफ खात्यातून आधी रक्कम काढण्यासाठी ऑफलाईन प्रोसेस करावी लागायची, जी फार किचकट तसेच सर्वसामन्यांच्या समजेच्या बाहेरची होती. मात्र गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल झाले. त्याचा फायदा जसा इतरांना झाला तसाच पीएफधारकांनाही झाला.

    आता पीएफ खात्यातील रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा पर्याय पीएफधारकांना मिळाला. मात्र हक्काच्या रक्कमेसाठी पीएफधारकांना जवळपास 20 दिवस प्रतिक्षा करावी लागते. आता ही प्रतिक्षा नाहीशी होणार आहे. आता नववर्षापासून पीएफ खात्यातील रक्कम एटीएमद्वारे काढता येऊ शकते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित्रा डावरा यांनी बुधवारी 11 डिसेंबरला याबाबतची माहिती दिली. कामगार मंत्रालयाकडून देशातील असंख्य कर्मचारी वर्गाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आयटी यंत्रणेत आवश्यक बदल केले जात आहेत.

    पीएफधारकांकडून करण्यात आलेला क्लेम लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच अनेक किचकट गोष्टी साध्या आणि सोप्या करण्याचा प्रयत्न आहे. आता पीएफधारक क्लेम केलेली रक्कम थेट एटीएममधून काढू शकतो. यामुळे या व्यवहारात आधीच्या प्रोसेसच्या तुलनेत मानवी हस्तक्षेप कमी होईन आणि सर्व सोप होईल. सिस्टम सातत्याने अपग्रेड होत आहे. दर 2 ते 3 महिन्यांनी तुम्हाला महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. जानेवारी 2025 पर्यंत मोठा बदल होईल, याबाबत मला विश्वास आहे. आपल्याकडे तेव्हा ईपीएफओकडे आयटी 2.1 व्हर्जन असेल”, असं सुमित्रा डावरा यांनी नमूद केलं.

    एटीएममधून तिच रक्कम काढता येईल, ज्यासाठी पीएफधारकाने क्लेम केला असेल. पीएफधारकांना खात्यातील सर्वच रक्कम काढता येत नाहीत. तसेच ठराविक रक्कम काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. तसेच विशेष स्थितीतच (लग्न, घर आणि इतर) सर्व रक्कम काढता येते. पीएफधारक ईपीएफओ वेबसाईट आणि उमंग अ‍ॅपद्वारे रक्कम काढण्यासाठी अर्ज करु शकतात.

    EPFO
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस अत्यंत धोक्याचे!

    April 16, 2026

    बापरे! जहाज बुडून तब्बल २५० जणांचा मृत्यू

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.