Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्वपरीक्षा
    शैक्षणिक

    एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्वपरीक्षा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 13, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नाशिक अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीत नवीन विद्यार्थ्यांना तर इयत्ता सातवी ते नववीसाठी रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे.

    सदस्य सचिव महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी मार्फत राज्यात इंग्रजी माध्यमाच्या 37 एकलव्य रेसिडेंशियल स्कूल चालविल्या जातात. नाशिक अपर आयुक्त कार्यालय नाशिक अंतर्गत 17 एकलव्य शाळा आहे. त्यामध्ये नाशिक प्रकल्पाच्या 5, कळवण, नंदूरबार आणि तळोदा प्रकल्पाच्या प्रत्येकी 3, धुळे प्रकल्पाच्या 2 तर राजूर प्रकल्पाच्या एका शाळेचा समावेश आहे.

    इयत्ता सहावीच्या 1020 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात मुलांच्या 510 तर मुलींच्या 510 जागांचा समावेश आहे. इयत्ता सातवीच्या 152, आठवीच्या 47 तर नववीच्या 38 रिक्त जागा प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे. सातवी ते नववीच्या प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचे विद्यार्थी पात्र आहे. तर इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा एसटी, डीएनटी, एनटी, एसएनटी प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.

    प्रत्येक एकलव्य स्कूलमध्ये इयत्ता सहावीसाठी 30 मुले व 30 मुली अशी 60 प्रवेश क्षमता असणार आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सातवी, आठवी, नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे.

    Eklavya Residency School Entrance Examination Nashik Nashik Upper Commissioner Project Officer Tribal Development Department
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif