Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»समृद्धीववर कारमधील अख्खं कुटुंब संपलं
    अपघात

    समृद्धीववर कारमधील अख्खं कुटुंब संपलं

    एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 28, 2026No Comments849 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    समृद्धी महामार्ग झाल्यामुळे राज्यातील दळणवळण खूप सोपे झाले आहे. सामान्यांचे प्रवासाचे अनेक तास वाचले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना समृद्धी महामार्गावरून प्रवास करता येतो. म्हणूनच इप्सित स्थळी लवकर पोहोचायचे असेल तर समृद्धी महामार्गाचा सर्रास वापर केला जातो. परंतु याच समृद्धी महामार्गावर याआधी अनेक भीषण आणि धक्कादायक अपघात झालेले आहेत. वेगात वाहन आल्याने काही वेळा अनेकांचा मृत्यू झाल्याचा घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, आता याच समृद्धी महमार्गावर मन सुन्न करणारी घटना घडली आहे. वॅगनर कारने प्रवास करणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचाच एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. याच अपघातत मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 105 च्या जवळ एक भीषण अपघात झाला आहे.  कार ट्रकवर आदळल्याने ही भीषण घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणइ एका मुलीचा समावेश आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाका परिसरात ही घटना घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार वॅगनर कारमद्ये बसून पाच जण चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होते. मात्र पवासादरम्यान, या कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की यात कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेता येईल का? यासाठी प्रयत्न केला जात होता. परंतु या अघातात कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीय, नातेवाईकांना बळ मिळो, अशी प्रार्थना केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif