शेंदुर्णी ता. जामनेर
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण त्रितपपुर्ती सोहळा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची आज सांगता झाली. श्री. त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात आयोजित या सप्ताहाचे यंदाचे हे ३६ वे वर्षे असुन सकाळी श्री. त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरा पासुन शहरातील मुख्य मार्गाने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यात आयोजक संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत, ह. भ. प. शिवाजी महाराज भगत तसेच कीर्तनकार प्रवचनकार मंडळी, वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व व वारकरी संप्रदाय महिला भजनी मंडळ नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ब्रम्हचारी भागवतकार ह. भ. प. बबन महाराज पिंपळसीम यांचे सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन झाले.
या सप्ताहात दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन झाले. गेल्या ६७ वर्षापासुन हरिपाठ महिला भजनी मंडळ हे रामकृष्ण हरी हा जप, तसेच अखंड वीणा पहारा व अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करत असते.