Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»लाचखोरीचा शेवट; अखेर तलाठी अनिल गहुकर निलंबित!
    महाराष्ट्र

    लाचखोरीचा शेवट; अखेर तलाठी अनिल गहुकर निलंबित!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 25, 2025Updated:September 25, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भद्रावती तालुक्यातील लाचखोरी प्रकरणात तलाठी अनिल लक्ष्मण गहुकर यांना महसूल प्रशासनाने अखेर निलंबित केले असून, या यशस्वी कारवाईमध्ये भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांची सक्रिय भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दैनिक लोकशाही वृत्तपत्राने या प्रकरणाचे निर्भीड आणि आक्रमक वृत्तांकन करत लाचखोरीविरुद्ध सर्व स्तरावर असंतोष व्यक्त केला, यामुळे तलाठी विरुद्ध कठोर प्रशासनिक कारवाई करण्यात आली आहे.

    निलंबन पत्रक

     

    भद्रावती तालुक्यातील पिपरी (दे) गावातील तलाठी अनिल गहुकर हे शेतकरी वर्गाकडून लाच घेतल्याच्या गंभीर आरोपात अडकले होते. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर इम्रान खान यांनी याविरोधात लेखी तक्रार करत महसूल प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

    या तक्रारीवर सुरू झालेल्या तपासणीत तलाठी गहुकर यांचे काही कर्तव्ये नीट पार पाडले गेले नसल्याचे दफ्तरातील नोंदींवरून उघडकीस आले. त्यांनी एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या काळात आवश्यक चलन न भरणे, दौरा दैनंदिनी अद्ययावत न ठेवणे तसेच साजा घोनाड तहसिल कार्यालयातून हटून वरोरा येथून येणे-जाणे करणे यांसही समस्या असल्याचे आढळले. तालुका प्रशासनाने या सर्व दोषांवरून निष्कर्ष काढत उपविभागीय अधिकारी वरोराच्या शिफारशीवर अनिल गहुकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या अधीन तातडीने निलंबित करण्याचा आदेश तहसिलदार भद्रावती यांनी जाहीर केला आहे.

    निलंबित असताना गहुकर यांचे मुख्यालय मुधोली तहसील कार्यालय असेल व तहसिलदारांच्या संमतीशिवाय ते मुख्यालय सोडू शकणार नाहीत. तसेच निलंबन काळातील निर्वाह भत्ताही तहसिलदारांच्या देखरेखीखाली दिला जाणार असल्याची माहिती दैनिक लोकशाहीच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

    या प्रकरणाचा शेवट म्हणून भाजयुमोचे पदाधिकारी इम्रान खान व श्रीपाद बाकरे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार विरोध आंदोलन केले. याचा परिणाम म्हणून अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलली. यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणाली आणि लोकसेवकांच्या जबाबदाऱ्या याबाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ही कारवाई प्रामाणिक प्रशासनाची ओळख सांगणारी आणि भ्रष्टाचाराचा शेवट करण्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif