Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अतिक्रमण… अतिक्रमण… अतिक्रमण..!
    ताज्या बातम्या

    अतिक्रमण… अतिक्रमण… अतिक्रमण..!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 15, 2026No Comments17 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनपाच्या महासभेत गाजला मुद्दा : नगरसेवकांनी आयुक्तांना घेतले फैलावर

    जळगाव : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाचा मुद्दा आज महानगरपालिकेच्या महासभेत चांगलाच गाजला. अतिक्रमण विभागाच्या अपयशामुळे शहरात अतिक्रमणाचा वेढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांचा वचक संपल्याचा संताप नगरसेवकांनी केला. शहरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाणी येत असल्याने नगरसेविकांनी प्रशासनाला धारेवर धरले. एकंदरीत आजची महासभा अतिक्रमण आणि पाणी पुरवठा या दोन विषयांच्या अवतीभवती फिरत होती.
    शहरातील वाढत्या अतिक्रमण, अशुद्ध पाणी पुरवठा या विषयावर नगरसेवक नितीन लढ्ढा, अरविंद देशमुख, नितीन बरडे, उज्ज्वला बेंडाळे, ॲड. सुचिता हाडा, अमर जैन, विजय बांदल यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अतिक्रमण विभाग काही भागात गरीब लोकांवर कारवार्इ करीत असून धनदांडग्यांना मात्र मुभा देत आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांचा वचक नसल्याने हे प्रकार वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर महापौर दीपमाला काळे यांनी आयुक्तांना सूचना करीत करीत काय कारवार्इ करणार असा जाब विचारला. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी उद्या गुरुवार दि. 16 एप्रिलपासून शहरातील अतिक्रमण काढण्याची कारवार्इ करण्यात येणार असून दंडात्मक कारवार्इ करुन साहित्य जप्त करण्यात येर्इल. अशुद्ध पाणी पुरवठ्यावर युद्धपातळीवर काम सुरु असून लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा होर्इल. यावेळी व्यासपीठावर महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव सतिश शुक्ला उपस्थित होते.
    शहराला विळखा घालणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्न आणि नागरिकांच्या नळातून येणाऱ्या पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाण्याचा मुद्दा या दोन्ही विषयांनी सभागृहात चांगलाच खळबळजनक माहोल निर्माण केला. यावेळी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागावर नगरसेवकांनी जोरदार टीका करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, शहरातील अतिक्रमण आता नियंत्रणाबाहेर गेले आहे. रस्ते, पदपथ, सार्वजनिक जागा या सगळ्यांवर अतिक्रमणाने अक्षरशः कब्जा केला असून नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. काही भागात कारवाईचा दिखावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मोठ्या अतिक्रमणधारकांवर कुठलीही ठोस कारवाई होत नाही, असा आरोपही करण्यात आला.
    या सगळ्याच्या केंद्रस्थानी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे होते. नगरसेवकांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधत आयुक्तांचा वचक संपला आहे असा गंभीर आरोप केला. प्रशासनातील शिथिलतेमुळेच अतिक्रमण करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून नियमांची भीती उरलेली नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले. विशेषतः गरीब आणि लहान व्यावसायिकांवर कारवाई केली जाते, मात्र प्रभावशाली आणि धनदांडग्यांना मोकळीक दिली जाते, या दुहेरी निकषांवरही सभागृहात संताप व्यक्त झाला.
    अतिक्रमणाच्या मुद्द्याइतकाच तीव्र सूर पाणीपुरवठ्यावरही उमटला. शहरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेविकांनी प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालला असल्याचा आरोप केला. नळातून येणारे पाणी पिण्यायोग्य नाही, मग नागरिकांनी जगायचे कसे? असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. नगरसेवक नितीन लढ्ढा, अरविंद देशमुख, नितीन बरडे, उज्ज्वला बेंडाळे, ॲड. सुचिता हाडा, अमर जैन, विजय बांदल यांनी प्रशासनाच्या कामकाजावर सविस्तर टीका करत विविध उदाहरणे मांडली. त्यांनी सांगितले की, शहरातील मुख्य रस्त्यांवरच नव्हे तर अंतर्गत भागांतही अतिक्रमणाचे जाळे पसरले आहे आणि त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही.
    महापौर दीपमाला काळे यांनीही या मुद्द्यांची गंभीर दखल घेत आयुक्तांना थेट जाब विचारला. नेमकी काय कारवाई होणार आणि ती कधी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभागृहातील वाढता दबाव पाहता आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी उत्तर देताना उद्या गुरुवार दि. 16 एप्रिलपासून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली जाईल, अशी घोषणा केली. या मोहिमेत केवळ अतिक्रमण हटवले जाणार नाही, तर दंडात्मक कारवाई करून साहित्यही जप्त केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
    पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर बोलताना आयुक्तांनी सांगितले की, अशुद्ध पाण्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून त्यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. पाईपलाईनमधील गळती, दूषित पाण्याचे स्रोत आणि देखभालीतील त्रुटी यांची तपासणी केली जात असून लवकरच नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    आयुक्तांच्या बंगल्याबाहेर हातभट्टी?
    शिवाजी नगरातील आयुक्तांच्या बंगल्या बाहेर अतिक्रमण करण्यात आले असून तेथे हातभट्टीची दारु विक्री होते असा आरोप नगरसेवक विजय बांदल यांनी केला. या गंभीर प्रकाराची दखल महापौर दिपमाला काळे यांनी घेवून त्वरीत कारवार्इची सूचना केली. यावर आयुक्त ढेरे यांनी परवानगी दिली का? असा प्रश्न अधिकाऱ्यांना केला तेव्हा हातभट्टीला परवानगी असते का? असा चिमटा नितीन लढ्ढा यांनी काढला.

    आजपासून शहरात अतिक्रमण हटाव
    वाढत्या अतिक्रमणावर नगरसेवकांनी संतताप व्यक्त केल्यानंतर आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला उद्या गुरुवार दि. 16 एप्रिलपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याची सूचना केली. सरसकट कारवार्इ करुन दंडात्मक कारवार्इ व साहित्य जप्त करावे असे त्यांनी सांगितले.

    नळजोडणीला युद्धजन्य परिस्थितीचे कारण
    मेहरूण व तांबापुरा भागात नागरिक नळ जोडणी करण्याची मागणी करीत असल्याचा मुद्दा नगरसेवक र्इब्राहिम पटेल यांनी मांडला. ते म्हणाले की, मनपाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला मात्र प्रशासन त्याकडे लण देत नाही. यावर प्रशशसनाने अजब लेखी उत्तर दिले असून त्यात युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे नळजोडणी होणार नाही असे उत्तर दिले आहे. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif