इतक्या हजार कोटींच्या गुंतवणूकीतून रोजगार निर्मिती?

मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारचे ३ मोठे निर्णय

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ३ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले. या धोरणाच्या कालावधीत ५ लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

त्याचसोबत द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजनेची घोषणा करण्यात आली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि काय निर्णय घेण्यात आले हे आपण जाणून घेणार आहोत…

 

उद्योग विभाग 

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद.

 

विधि व न्याय विभाग

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.

Leave A Reply

Your email address will not be published.