Friday, December 9, 2022

धक्कादायक.. झाडांना पाणी देताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

अमळनेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल जवळील झाडांना पाणी देताना वायरला स्पर्श झाल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना 28 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

स्वप्नील मच्छीन्द्र पाटील (वय २७. रा, टाकरखेडा ता. अमळनेर) हा सकाळी साडे अकरा वाजता टाकरखेडा अमळनेर रस्त्यावर गट नंबर १९४ व १९५ मधील शेतात असलेल्या नाश्त्याच्या हॉटेलच्या आवारात झाडांना पाणी देत असताना पाण्याच्या मोटरच्या कट झालेल्या वायरवर पाय पडल्याने त्याला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

दरम्यान त्याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कपिल पाटील करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या