Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुकीची घोषणा!
    राजकारण

    विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुकीची घोषणा!

    ‘या’ तारखेला मतदान अन्  त्याच दिवशी मतमोजणी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 16, 2026No Comments359 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उद्धव ठाकरे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक घेतली जात आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मतं आहेत, अशात महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

    विधान परिषदेच्या ९ जागांसाठीचे मतदान १२ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदारांमार्फत) निवडून आलेले उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, संजय केणेकर यांसारख्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत असल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १३ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक आहे.

    महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना २३ एप्रिल २०२६ रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. अर्जांची छाननी २ मे २०२६ रोजी केली जाईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ४ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मतदान १२ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी म्हणजे १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मतांची मोजणी केली जाईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif