Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर
    जळगाव

    जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर

    जळगाव प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील 09 प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
    या पार्श्वभूमीवर जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या नगर परिषदा/ नगर पंचायतीच्या हद्यीतील ज्या प्रभागांमध्ये मतदान आहे त्या प्रभागातील मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना 19 आणि 20 डिसेंबर 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
    मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 डिसेंबर 2025 रोजी संबंधित मतदान अधिकारी , कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचणार आहेत त्यामुळे ही सुटी देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
    हि सुटी राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव यांच्या आदेश क्रमांक-रानिआ/मनपा- 2008/प्र.क्र.9/का-5 दिनांक 11 नोव्हेबर 2008 च्या आदेशान्वये देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संबंधित शाळांच्या सुट्यांची नोंद पालक व विद्यार्थी यांनी घ्यावी, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif