Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
    ताज्या बातम्या

    राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 18, 2026Updated:February 18, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सात जागा या महाराष्ट्रातील आहेत. महायुतीच्या वाट्याला सहा जागा तर एक जागा महाविकास आघाडीच्या खात्यात येणार आहे. या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवण्यात येणार का, याची चर्चा रंगली आहे. राज्यसभेसाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करता येईल. तर 16 मार्चपर्यंत मतदान करता येणार आहे. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहे.

    महाराष्ट्रातील 7,पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 5-5 जागांवर निवडणूक होईल. तामिळनाडूच्या 6 जागांवर निवडणूक होईल. राज्यातील फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत. हे सर्व येत्या 2 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.

    राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन देण्यात आले. 5 मार्चपर्यंत उमेदवार अर्ज भरू शकतील. 6 मार्चपर्यंत अर्ज छाननी होईल. 9 मार्च रोजीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होईल. सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर संध्याकाळी 5 वाजेपासून मत मोजणी होईल. 20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

    दोन वर्षांपूर्वी राज्यात 2024 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपचे 131, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 57, अजित पवार पक्षाचे 40 असे महायुतीचे एकूण 228 आमदार निवडून आले आहेत. अपक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर महायुतीचे सहा खासदार निवडून जातील. यामध्ये भाजपचे चार तर मित्र पक्ष शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक खासदार निवडून जाईल.

    Bihar Congress Election Programme Mahavikas Aghadi mahayuti Nationalist Congress Party Rajya Sabha sharad pawar Uddhav Thackeray group West Bengal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अज्ञानाचा काळोख घालवून ज्ञानाचा लक्ख प्रकाश पसरवला!

    March 9, 2026

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?

    March 5, 2026

    ग्रहण फेडण्यासाठी नदीत अंघोळीला गेले अन…

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.