लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची आज विशेष सभेत निवड करण्यात आली. महापौर दिपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. भाजपाकडून 10 शिवसेना पाच तर उबाठा सेनेच्या एक सदस्यांची निवड करण्यात आली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर स्थानी समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. स्थानी व महिला बालकल्याण समितीत उबाठा गटाचाही समावेश झाला आहे.
भाजपाकडून दीपक सुर्यवंशी, नितीन लढ्ढा, चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, विशाल भोळे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोर्इटे, वंदना इंगळे, नितीन सपके तर शिवसेनेकडून विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, विक्रम सोनवणे, सागर सोनवणे, नरेंद्र पाटील तर शिवसेना (उबाठा) गटाकडून पटेल ईब्राहीम मुसा यांची निवड करण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समिती सदस्यांची देखील निवड करण्यात आली त्यात रंजना वानखेडे, पुजा जगताप, विद्या सोनवणे, सुरेखा तायडे, गायत्री राणे, सिंधू कोल्हे, प्रतिभा देशमुख, डॉ. अमृता सोनवणे, हिनाबी शाकीर खान यांची निवड करण्यात आली.

