Friday, May 20, 2022

खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत ६५.५२ टक्के मतदान…

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे काल मतदान पार पडले. यात एकूण ३७५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या व विविध आरोप प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली असून अनेकांनी या संस्थेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी कंबर कसली होती.

काल दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत फक्त २५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदारांचा ओघ वाढल्याने पाच वाजेपर्यंत ६५.५२ टक्के मतदान झाले. कोरोना मुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यानंतर कोविड नियमाचे पालन करून निवडणुकीस परवानगी दिली होती. तरीही अनेक उमेदवार व मतदार विना मास्क फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अनेक मतदारांनी अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याची कुरकुर केली असली तरी आता उमेदवारांना मतपेट्या उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या