एक उमेदवार एकाच जागेवरुन निवडणूक लढवणार ? ; केंद्र सरकारकडे प्रस्ताव

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी निवडणुकीशी संबंधित काही महत्त्वाचे बदल करावे, अशी मागणी केली आहे.

एकावेळी एकापेक्षा जास्त जागावरुन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. एकावेळी दोन-दोन जागांवर निवडणूक  लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोग मोठा धक्का देण्याच्या तयारी असून येत्या काळात एक उमेदवार एकच जागा लढवू शकतो. त्याला दुसऱ्या जागी निवडणूक लढवू देण्यास मुभा देऊ नये. तसेच एक्सिझ पोल्ससह जनमत चाचण्यांवर बंदी आणवी, अशी भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे.

त्यासंबंधी मागणी करणारा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारकडे  पाठवला आहे. निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे बदल केले जावेत या दृष्टीनं मुख्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पावलं टाकली आहे. निवडणूक आयोगाने पाठलेला हा प्रस्ताव जर मान्य झाला, तर 1951च्या कलम 37(1) मध्ये मोठा बदल होणार आहे.

आयोगाच्या प्रमुख मागण्या

–  पॅनकार्ड प्रमाणे वोटिंग कार्ड देखील आधारशी लिंक करण्यात यावे.

– तसेच देशातील राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला द्यावेत.

– एका उमेदराला एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवू देऊ नये, त्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 33 (7) मध्ये दुरुस्तीस मंजुरी द्यावी.

– निवडणूक अधिसूचनेच्या दिवसापासून जोपर्यंत निवडणूक पूर्ण होत नाही तोपर्यंत जनमत चाचण्या आणि  एक्झिट पोल्स जाहीर करण्यावर बंदी घालावी.

Leave A Reply

Your email address will not be published.