Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»प्रचाराचा आज शेवटचा दिवस; रात्री प्रचार तोफा थंडावणार !
    जळगाव

    प्रचाराचा आज शेवटचा दिवस; रात्री प्रचार तोफा थंडावणार !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 30, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रचाराचा आज शेवटचा दिवस; रात्री प्रचार तोफा थंडावणार !

    १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ६३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

    जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार रविरवारी दि. ३० रात्री थंडावणार आहे. दि. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मदतदानासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाभरातील १८ ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या ४६४ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण ९७७मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

    गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पालिका निवडणुकीची रणधुमाळी रविवारी रात्री थंडावणार आहे. गेल्या महिनाभरात प्रचार, आरोप-प्रत्यारोप तसेच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या गाठीभेटीने शहरी प्रभाग ढवळून निघाले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांकडून मतदान करून घेण्यासाठी जय्यत तयारीकरण्यात आलेली असताना दुसरीकडे मंगळवारी दि. २ होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसह दुसऱ्याच दिवशी दि. ३ डिसेंबरच्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक ती सर्व तयारी निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.

    जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी १५५५, तर नगराध्यक्षपदासाठी ७७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक उमेदवार भुसावळ व वरणगाव (प्रत्येकी ८) असून, मुक्ताईनगर व पाचोरा येथे सरळ लढत होणार आहे. निवडणुकीत भुसावळ ही ‘अ’ वर्ग नगरपरिषद, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर आणि पाचोरा या ‘ब’ वर्ग नगरपरिषद, तर यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, सावदा, रावेर, एरंडोल आणि फैजपूर, या ‘क’ वर्ग नगरपरिषद आहेत. शेंदूर्णी आणि मुक्ताईनगर या दोन नगरपंचायती आहेत. जिल्ह्यात ४६४ सदस्य पदांसाठी निवडणूक होणार असून, एकूण प्रभागांची संख्या २४६ आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रियेकरता आवश्यक मतदान केंद्राची निवड, तेथील व्यवस्था, अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक अशा सर्व प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon nagar palika election
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif