बसमधून वृद्ध महिलेचा ऐवज लंपास

0

भडगाव : मालेगाव ते जामनेर दरम्यान प्रवास करणाऱ्या बसमध्ये एका ज्येष्ठ महिलेच्या पर्समधून सोन्याची मणी असलेली पोत व मोबाईल फोन चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भडगांव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमन उत्तम मालपुरे (वय ७०, व्यवसाय गृहिणी, रा. लोहटार ता. पाचोरा, ह.मु. पुणे) या २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मालेगाव ते जामनेर बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मणी असलेली पोत तसेच ५ हजार रुपये किमतीचा एम.आय. कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. या घटनेनंतर फिर्यादी यांनी भडगांव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार भरत दौलत लिंगायत हे करीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बसमधून प्रवास करताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.