Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कुणाच्या तरी सांगण्यावरुन खेवलकरांना गोवले!
    जळगाव

    कुणाच्या तरी सांगण्यावरुन खेवलकरांना गोवले!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 26, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कुणाच्या तरी सांगण्यावरुन खेवलकरांना गोवले!

    राजकारण खालच्या थराला : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आरोप

    जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क

    एकनाथ खडसे यांनी प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्वांना जामीन मिळाल्याचे म्हटले. प्रांजल खेवलकर यांना खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आले होते. खेवलकर यांच्यावर फार मोठे गुन्हे असे दावे करत त्यांना पहिला आरोपी करण्यात आले. कुणाच्यातरी सांगण्यावरुन कोणीतरी खेवलकर यांना अडकवल्याचा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला. प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी भागातील एका खोलीत पार्टी करत असताना पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. प्रांजल खेलवरकर यांच्यासह इतरांना 7 जणांना अटक करण्यात आली होती. खेवलकर यांच्यासह इतरांना जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्याचे राजकारण किती खालच्या थरावर गेले, याचे उत्तम उदाहरण आहे, असे श्री. खडसे यांनी म्हटले.

    प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर ते उद्या तुरुंगाबाहेर येऊ शकतात. एकनाथ खडसे यांनी जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळताच प्रतिक्रिया दिली आहे. प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात गुरुवारी प्रांजल खेवलकर यांच्यासह अन्य जणांना जामीन मिळाला आहे. त्यांनी कुठलेही ड्रग्ज सेवन केलेले नव्हते किंवा बाळगले नव्हते तरी त्यांना खोट्या आरोपाखाली रेव्ह पार्टी केली म्हणून सांगितले गेले. प्रत्यक्ष चार ते पाच जण एका घरात पार्टी करत होते ती रेव्ह पार्टी होऊ शकत नाही. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यावर फार मोठे गुन्हे आहेत असा दावा केला गेला. त्यामुळे त्यांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी केले मात्र प्रांजल खेवलकर यांच्यावर आयुष्यात एकही गुन्हा नव्हता. कोणीतरी कोणाच्यातरी सांगण्यावरून प्रांजल खेवलकर यांना गोवण्यात आला आहे.

    प्रांजल खेवलकर यांना आता जामीन मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयात होणाऱ्या खटल्यात प्रांजल खेवलकर निर्दोष सुटतील, असा माझा विश्वास असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. मात्र, महाराष्ट्रातील राजकारण किती खालच्या थरावर गेलेला आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही खडसे म्हणाले.

    #ncp Eknathrao Khadse jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    राहुल गांधी यांनी चर्चेपासून पळू नये : भाजपची मागणी

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif