Wednesday, September 28, 2022

गृहमंत्रीपदाचा इंगा दाखवून दोन-चार जणांना आत टाका: एकनाथराव खडसे

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धरणगाव तालुक्यात एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे देखील उपस्थित आहेत. याप्रसंगी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

तसेच खडसे म्हणाले की, आतापर्यत दीड-दोन वर्षापूर्वीच मी-मी म्हणणाऱ्या दोन-चार जणांना आत टाकून गृहमंत्रीपद काय असते, हे दाखवायला पहिजे होते, गृहमंत्रीपद काय असते ते दाखवा.

दरम्यान खडसे म्हणाले की, माजी गृहमंत्र्यांच्या घरावर इडीच्या धाडी पडतात, फोन टॅप केले जातात, याच माध्यमातून अनेकदा अडकववण्याचा प्रयत्न केला जात आहे, जर मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा. जे काही सत्य असेल ते जनतेसमोर आणा हेच सरकारला माझे सांगणे आहे.

मी-मी म्हणणाऱ्याची शेकडो प्रकरणं आहेत, जरा गृहमंत्रीपदाचा हिसका, इंगा दाखवा. जे सत्य आहे तेच करा, पण ज्यांनी-ज्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना भोगायला लावला, तर अशी परिस्थितीच निर्माण होणार नाही, असे खुला इशारा पवार यांच्या समोरच खडसे यांनी गृहमंत्री ना. वळसे पाटील यांना दिला.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या