जळगावात कोरोना काळात साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार : एकनाथराव खडसे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठा आरोप केला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये विविध साहित्य आणि औषधांची खरेदी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या खरेदीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, असा गंभीर आरोप खडसे यांनी केलाय.

कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औषध अधिक साहित्य यांची फार मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. ही खरेदी काही राज्य सरकार व स्थानिक विकास निधी आमदार व खासदार निधीतून करण्यात आली, या खरेदीची आवश्यकता होती.

मात्र, घाई घाई मध्ये खरेदी करण्यात आली. परंतु या खरेदीच्या वेळी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याची विनंती करून देखील अद्यापपर्यंत चौकशी नाही. तसेच याबाबत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी देखील चौकशीची मागणी केल्याचे एकनाथ खडसे यांनी  पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

या गैरव्यवहाराबाबत जळगावातील दिनेश भोळे व माधुरी अत्तरदे यांनी सत्र न्यायालय दावा दाखल करून कारवाईची मागणी केली होती. सत्र न्यायाधीश यांनी याबाबत निकाल देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले होते, अशी माहिती देखील खडसे यांनी दिलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.