मंत्रिपदासाठी वरिष्ठांना भेटावे; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात मोठ्या सत्तासंघर्षांनंतर (Maharashtra Political Crisis) शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. सत्ता स्थापन झाल्याच्या अनेक दिवसांनंतर बहुप्रतीक्षित असलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठे नाराजी नाट्य सुरु आहे.

बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे (Pankaja Munde) देखील नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मुंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय असणारे आमदार एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी भाष्य करत पंकजा मुंडे यांना सल्ला दिलाय.

याबाबत खडसे म्हणाले की,  मंत्रीमंडळ विस्तार अपूर्ण दिसत आहे. पुढील काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. पण अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचं दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे असा सल्ला खडसे यांनी त्यांना दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here