फ्रीज एवढे खोके कुठे जात होते?; शिंदेंचा सवाल

0

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. बुलडाण्यातील (Buldhana) चिखली इथल्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारचा खोके सरकार असा उल्लेख केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात फ्रीजएवढे मोठे खोके नेमके कुठे जात होते हे सगळ्यांना माहिती आहे. आता ते लवकरच शोधून काढतो असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

शिंदेचा इशारा

शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी आज गुवाहाटीमध्ये (Guwahati) कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो, लपूनछपून करत नाही, फ्रीजएवढे कंटेनर भरून खोके कुणाकडे गेले होते, ते कोण पचवू शकतो हे सर्वांना माहित आहे, एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर ते आम्ही आणू असा इशाराच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.

त्यांची मानसिकता ढळलेली

उद्धव ठाकरे हे नैराश्यातून शिंद गटावर आरोप करत आहेत, त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, त्यांची मानसिकता ढळलेली आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यात नवीन सरकार बनल्यानंतर एक सकारात्मक चित्र निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे गटाला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत, त्यातून ते सावरले नाहीत अशी बोचरी टीकाही शिंदे यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.