Wednesday, August 17, 2022

शिंदे- फडणवीस सरकारची कसोटी.. आज होणार निर्णय

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु होता.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सरकार स्थापन केले. दरम्यान शिवसेनेला पाठोपाठ मोठे धक्के बसत आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज कसोटी आहे. दरम्यान शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदारांना घेवून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

- Advertisement -

- Advertisement -

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. आज शिंदे आणि फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. मात्र आज शिंदे सरकारची खरी कसोटी आहे. आजच्या निकालानंतर 21 जूनपासून राज्यात सुरू असलेलं राजकीय संकट संपणार आहे. म्हणजेच आज शिंदे विधानसभेत आपले सरकार बहुमतात असल्याचे सिद्ध करतील.

आज सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज आज सकाळी 11 वाजता सुरू होणार असून बहुमत सिद्ध करण्यासाठी शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव आणला जाणार आहे. त्यानंतर या प्रस्तावावर मतदान होईल. मात्र शिंदे सरकार प्रचंड बहुमताने विश्वास संपादन करेल, असा विश्वास भाजपनं व्यक्त केला आहे. आम्ही 166 मतांनी बहुमत सिद्ध करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या