Friday, December 9, 2022

वाड वडिलांची पुण्याई दोघांनी गोठवली- एकनाथराव खडसे

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर राजकारणात ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटाचा वाद सुरूच आहे. या वादात निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. याबाबत राजकारणातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली

- Advertisement -

प्रतिक्रिया देतांना खडसे म्हणाले की, दोघांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा असं म्हणत एकनाथ खडसेंनी खंत व्यक्त केली. वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवलं. आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले ही, वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली.

यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा

मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा असे एकनाथ खडसे म्हणाले. वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवलं. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतू, तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवण हे अत्यंत दु:खद गोष्ट आणि क्लेशदायक असल्याचे खडसे म्हणाले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाबाबत एकनाथ खडसे यांनी ही खंत व्यक्त केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या