जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर दिल्लीत बैठक सुरू झाल्या आहेत. तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली असून या बैठकीत लोकसभेतील अपयशावर विचार मंथन करण्यात आले. यावेळी मोठी बातमी समोर आली असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश केला जाणार आहे. भाजपमध्ये घरवापसी होताच खडसेंना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
आता राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुका होण्याआधीच एकनाथ खडसेंनी घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. पण रक्षा खडसे हे निवडून येतील तेव्हाच त्यांचा प्रवेश केला जाईल, असंही म्हटलं जात होतं. आता रक्षा खडसे यांचा विजय झाल्याने आता एकनाथ खडसेंना प्रवेश दिला जाणार आहे.
याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सुचक विधान केलंय. अद्याप खडसेंचा भाजपात प्रवेश झाला नाहीये. ज्यावेळी ते भाजपमध्ये येतील त्यावेळी पाहू असं बावनकुळे म्हणाले आहेत.