टॉप १० मुख्यंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे ८ व्या स्थानी

0

लोकशाही न्युज नेटवर्क
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील ४० आमदार फोडून भूकंप घडवणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना अजून जनमानसावर पकड बसविता आली नसल्याचे म्हटले जात असून टॉप १० मुख्यंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे ८ व्या स्थानी तळाशी आल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

india Today-C Voter ने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणात देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. यामध्ये देश ते राज्य पातळीवरील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये देशातील टॉप १० मुख्यमंत्री कोण, यासाठी जनतेकडून कौल घेण्यात आला. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ २.२ टक्केच लोकांनी पसंती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.