Tuesday, May 24, 2022

व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात अश्विन पाटील यांचा सत्कार

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्युज नेटवर्क 

- Advertisement -

 

- Advertisement -

मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक विभागात सात पेटंट आपल्या नावावर मिळविणाऱ्या अश्विन पाटील यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल खर्चे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, प्रा. संदीप खाचणे, योगेश सुशिर, प्रवीण पांडे उपस्थित होते. अश्विन पाटील यांनी एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद येथुन पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी ऑटो पार्टस च्या क्षेत्रात कार्य केले, स्ट्रक्चर डिजाईन इंजिनिअर तसेच मशीन डिजाईन इंजिनिअर या क्षेत्रात कार्य केले. सोबतच ते पेयपर स्टील चे को-फाऊंडर देखील आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी दिली.

महाविद्यालयीन जीवन समृद्ध मानवी जीवनाचा पाया मानला जातो. अगणित विद्यार्थ्यांचा हा पाया सर्वार्थाने बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे, आयुष्यावर जीवनमूल्यांचे संस्कारासह वक्तशिरपणा, वेळापत्रकानुसार वर्तवणूक, वेळच्यावेळी अभ्यास या गोष्टींची सवय लावणारे प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवर परिश्रम घेणे आवश्यक असते.

शिस्तीच्या माध्यमातून स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला जमलं नाही तर आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. शिस्त ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या जगात फार चांगली मानली जात नाही. थोडीशी बदनामच असते. परंतु खरी शिस्त ही वागण्याबाबत नसून मनाला, विचारांना असावी लागते.स्वत: आपण स्व-नियमित जीवनपद्धतीचे आदर्श उदाहरण आहेत.

अत्यंत सुसंस्कृत,मनमिळाऊ, साधी राहणी अन् उच्च विचारसरणी लाभलेल्या, अनुकरणीय व्यक्तिमत्त्वाचे धनीअश्विन पाटील आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी यावेळी व्यक्त केले.

कोलते महाविद्यालयाला शासनमान्य शिक्षणाचा अति उच्च दर्जाचे नामांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी ९५% च्या वर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयात नामांकित कंपन्यांचे ओपन कॅम्पस आयोजित केल्या जातात.त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठीच नव्हे तर बाहेरील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सामाजिक देने समजून महाविद्यालयाने नोकरीचे दालन उपलब्ध करून दिले आहे.

महाविद्यालामार्फतदरवर्षी २०० हुन अधिक ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितल्या जाते. महाविद्यालयाची ज्ञानगंगा ही महाराष्ट्रातल्या कानाकोपयात पोहचवून आपले वेगळेपण निर्माण केले आहे.

महाराष्ट्रातल्या कानाकोपयातून विद्यार्थी व्यावसायिक व उच्च तंत्रशिक्षण घेण्यासाठी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात येत असताना दिसत आहेत हेच या संस्थेच्या यशाचे गमक असल्याचे अश्विन पाटील यांनी सांगितले. तसेच संस्थेअंतर्गत चालविण्यात येणा-या विविध योजनेअंतर्गत विद्याथ्र्यांकरीता उपलब्ध करुन दिलेल्या अद्ययावत सोयी-सुविधा पाहुन महाविद्यालयाचे कौतुक केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या