आरोपीच्या पिंजऱ्यात सरकारी वकील ?

0

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील संवेदनशील खटल्यास विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे कार्यालयात केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अखेर ॲड. प्रवीण चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील पदाचा आज राजीनामा दिला. 8 मार्चला विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांचा व्हिडीओ असलेला पेनड्रॉईव्ह विधानसभा अध्यक्षांना सादर करून विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांचे काही कारनामे तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासाठी केलेली खोटी कागदपत्रे आणि खोटे साक्षीदार याबाबत आरोप करून खळबळ उडवून दिली. त्या दिवसापासून महाराष्ट्रात खळबळ उडाली. विशेषत: जळगाव जिल्ह्यात त्याचे मोठे पडसाद उमटले.

हे देखील वाचा-

पेनड्राईव्ह बॉम्बचे जळगाव कनेक्शन ?

आज देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक पेन ड्राईव्ह सादर करून आणखी खळबळ उडवून दिली. बी.एच.आर. खटल्यात आता विशेष सरकारी वकील म्हणून काम पहाणारे ॲड. प्रवीण चव्हाण हे बी.एच.आर. पतपेढीचे चेअरमन यांचेवर गुन्हा दाखल झाला असतांना आरोपी प्रमोद रायसोनी यांचे वकील म्हणून काम पाहिले हेाते. आरोपी नंबर एकचे वकील असणारे ॲड. प्रवीण चव्हाण त्याच खटल्यास विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पहातात. ही बाब गंभीर असल्याचे देवेंद्र फडणवीस यांचा मुद्दा रास्त आहे. त्यामुळे विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यातील संवेनदशील खटल्यात जेवढी सनसनाटी निर्माण केली. तेवढीच सनसनाटी आता त्यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे निर्माण झाली आहे. त्यांचे संदर्भात करण्यात आलेले स्टिंग ऑपरेशन हे पूर्णपणे खोटे असून चुकीचे करण्यात आले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तो आभास करण्यास आला आहे. असा खुलासा विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी विविध खटल्यांमध्ये आरोपींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्याची उलट तपासणी घेणाऱ्या ॲड. प्रवीण चव्हाण यांना स्वत: मी तसा नाही असे खुलासे करावे लागत आहेत. हे करत असतांना कोणत्या गुन्ह्याच्या खटल्यातील आरोपीची वकीलांकडून प्रश्‍नाची सरबत्ती केल्यावर आरोपीची जशी भंबेरी उडते तशीच काही प्रकारे माध्यमांना मुलाखती देत असतांना ॲड. प्रवीण चव्हाण यांची अवस्था झालेली दिसत होती. त्यांच्या देहबोलीवरून ते घाबरलेले होते. असे जाणवत होते. एखाद्या खटल्यात न्यायालयात युक्तीवाद करतांना वकिलामध्ये जो जोश दिसून येतो तसा जोश माध्यमांसमोर बोलतांना दिसत नव्हता हे तितकेच खरे आहे.

हे देखील वाचा-

पेनड्राईव्ह बॉम्बमुळे इतर खटल्यांबाबतही संशय कल्लोळ !

स्टिंग ऑपरेशन हे झालेच नाही तथाकथित स्टिंग ऑपरेशन हे खोटे आणि चुकीचे आहे असे म्हणणारे सरकारी विशेष वकील यांनी स्टिंग ऑपरेशन झाल्याची कबुली दिली. त्यांचेच एक अशील तेजस मोरे यांनी भिंतीवरचे घड्याळ भेट देऊन त्याद्वारे हे कथित स्टिंग ऑपरेशन केल्याची कबुली ॲड. प्रवीण चव्हाण यांनी केली आहे. या स्टिंग ऑपरेशन मध्ये पुण्यातील एक पत्रकार पोलिस खात्यातील एका शिपायाचा समावेश असल्याचा इन्कार केला असला तरी त्यांचे पश्‍चात तेजस मोरेसोबत कुणीतरी येत होते अशीही माहिती ॲड. प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे. तेजस मोरे यांनी ॲड. चव्हाण यांना भिंतीवरचे घड्याळ भेट दिल्याचे स्पष्ट नाकारले आहे. तसेच स्टिंग ऑपरेशन केल्याचेही त्यांनी स्पष्ट नाकारले आहे. इतकेच नव्हेतर आतापर्यंत मी माध्यमांसमोर आलो नाही. कारण माझ्या कुटुंबियांची मनस्थिती ठिक नव्हती. एक दोन दिवसात मी त्यातून सावरलो की, पुराव्यानिशी मी माध्यमांसमोर मी माझे म्हणणे सादर करणार आहे. त्यात ॲड. प्रवीण चव्हाण याचां पर्दाफाश होईल असा दावा तेजस मोरे यांनी केला आहे.

आतासुध्दा तेजस मोरे यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. माझे इंग्लिश चांगले असल्यामुळे काही फिर्यादीचे ड्राफ्ट मी ॲड. प्रवीण चव्हाण यांना करून देत असे. तसेच जळगावच्या भोईटे यांच्या घरावर धाडी टाकणाऱ्या पोलिसांचे जेवणाचे बिल मी गुगल पे द्वारे केलेले आहे. तसेच भोईटेंच्या घरावर धाड टाकण्याचा प्लॉन मी रचलेला होता. तेजस मोरे यांचा हा आरोप गंभीर आहे. तो सिध्द होईल न होईल. परंतु आज ॲड. प्रवीण चव्हाणांच्या कृत्याचा भंडाफोड केलेला आहे. ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या या कृत्यामागे एकनाथराव खडसे असल्याचा उल्लेखही तेजस मोरे यांनी केला आहे.

काहीही करून माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोक्का लावला पाहिजे असे ॲड. चव्हाण यांचा आग्रह होता असेही तेजस मोरेंनी सांगितले आहे. त्यामुळे ॲड. प्रवीण चव्हाण यंनी या सर्व गोष्टी नाकारल्या असून लवकरच मी कायदेशीर कारवाई करेल असे ॲड. प्रवीण चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ न्यायालयाच्या पिंजऱ्यात आरोपी म्हणून उभे राहून आपले स्पष्टीकरण विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी करावे लागेल हा एक दैवर्दुविलासच म्हणावा लागेल. आता तेजस मोरे माध्यंमासोर जे पुरावे सादर करणार आहे. त्यात काही नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.