बापरे ! गेमिंग ॲपद्वारे फसवणूक; 17 कोटींची रोकड जप्त (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ईडीने  मोबाईल गेमिंग अॅपद्वारे फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात कोलकातामधील 6 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान गार्डन रीच भागातील निसार अहमद खान नावाच्या ट्रान्सपोर्टरच्या घरातून 17 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी आमिर खान फरार आहे. त्याच्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे.

ईडीला मिळालेले पैसे व्यावसायिकाच्या घरातील पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये बेडखाली प्लॅस्टिकच्या पाकिटात भरून बॅगेत ठेवले होते. यात बहुतांश 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे बंडल आहेत. नोटांची संख्या एवढी आहे की मोजणीसाठी बँकेतून नऊ मशीन मागवण्यात आल्या होत्या. घडलेल्या प्रकारामुळे  खळबळ उडाली.

आमिरने ऑनलाइन फसवणुकीसाठी ई-नगेट्स नावाचे मोबाइल गेम अॅप सुरू केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला अॅप वापरकर्त्यांना कमिशनचे बक्षीस देण्यात आले आणि त्यांना वॉलेटमधील शिल्लक रक्कम थेट काढण्याची परवानगी देण्यात आली. सुरुवातीला लोकांचा विश्वास जिंकल्यानंतर अधिक कमिशनचे आमिष देण्यात आले. यामुळे मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी गुंतवणूक केली. लोकांकडून भरीव रक्कम गोळा केल्यानंतर अचानक सिस्टीम अपग्रेडेशन, एलईएकडून तपास आदी कारणांनी त्या अॅपमधून पैसे काढणे बंद करण्यात आल्याचा आरोप आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.