Monday, January 30, 2023

अनिल परब यांच्यावर ईडीने केली कारवाई ! संपत्ती जप्त

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई – नव्या वर्षाचे शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का देणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somayya) यांनी आज पुन्हा एकदा झटका दिला आहे. शिवसेनेचे (shivsena) आमदार अनिल परब (anil parab) यांना हा झटका बसला आहे. कारण ईडीनं त्यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांची एकूण १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दापोली (dapoli) येथील साई रिसॉर्टच्या संबंधी ही संपत्ती आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साई रिसॉर्टशी संबंधीत प्रकरणात ईडीनं अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांची तीन ते चार वेळा चौकशी देखील झाली होती. याप्रकरणी पर्यावरण खात्यानं अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती.दरम्यान, ईडीच्या चौकशीतून हे समोर आलं आहे की, अनिल परब यांचं सदानंद कदम यांच्याशी सामंजस्य आहे. त्यातूनच कदम यांना स्थानिक एसडीओ कार्यालयातून बेकायदा परवानगी मिळाली. त्यानुसार शेतजमीनीचं बिगरशेत जमिनीत रुपांतर करण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करत रिसॉर्टचं बांधकाम झालं.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे