Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»हेराल्ड प्रकरणात हवालाची लिंक ED ला मिळाली…
    राजकारण

    हेराल्ड प्रकरणात हवालाची लिंक ED ला मिळाली…

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 4, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

    ईडी (ED) सूत्रांकडून दावा करण्यात आला की, नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणाशी संलग्न कंपन्या आणि थर्ड पार्टीत झालेल्या हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला (ED) हवाला लिंक मिळाली आहे. त्यामुळे ईडी पुन्हा कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करणार आहे. यापूर्वी दोघांनी केलेल्या वक्तव्याची फेरतपासणी केली जाणार आहे.

    दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाच्या कार्यालयाच्या तपासणीदरम्यान ईडीला काही कागदपत्रे सापडली आहेत. मुंबई आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्सच्या व्यवहाराचे पुरावे कागदपत्रांमध्ये मिळाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी हे अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यंग इंडियाच्या कार्यालयाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तपास यंत्रणा मोठी कारवाई करेल, मात्र ही कारवाई काय असेल, हे अद्याप सूत्रांकडून सांगण्यात आलेले नाही.

    ईडीच्या पथकाने मंगळवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेराल्डच्या 16 ठिकाणी छापे टाकले होते. सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बुधवारी ईडीने दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडिया कंपनीचे कार्यालय सील केले. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला कर्नाटक दौरा सोडून दिल्लीला परतले.

    नॅशनल हेराल्डप्रकरणी यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झाली आहे. यंग इंडियाकडून रोखीसंबंधी इतर कोणताही लाभ घेतला नसल्याचे सोनिया गांधी यांनी चौकशीत सांगितले होते. दरम्यान, यंग इंडियाकडून मिळालेल्या कागदपत्रांनंतर ईडी विभागाचे अधिकारी राहुल, सोनिया गांधी यांच्या उत्तरावर समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांच्या जबाबांची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. ​​​​​​

    नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधी यांची 3 दिवसांत 12 तास चौकशी करण्यात आली. ईडीने 21 जुलैला 3 तास, 26 जुलैला 6 तास आणि 27 ऑगस्टला 3 तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. ईडीने जूनमध्ये पाच दिवसांत राहुल गांधींची 50 ता्सांपेक्षा जास्त चौकशी केली होती.

     

    #herald #rahulgandhi #soniagandhi Congress ED
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!

    May 11, 2026

    पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif