१२ वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ३१ हजारापर्यंत पगार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडनं (ECL) मायनिंग विभागात रिक्त जागांवर भरती करण्यासाठीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एकूण ३१३ जागांवर भरती केली जाणार आहे.

तर या जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून १० मार्च २०२२ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.

रिक्त जागांची माहिती
विनाआरक्षित- १२७ जागा
ईडब्ल्यूएस- ३० जागा
ओबीसी- ८३ जागा
अनुसूचित जाती- ४६ जागा
एसटी- २३ जागा
बॅकलॉग (एसटी)- ४ जागा

नोकरीसाठी उमेदवाराचं किमान वय १८ वर्ष असणं बंधनकारक असून वयाची कमाल मर्यादा ३० वर्ष इतकी आहे. तसंच एससी आणि एसटी आरक्षणातील उमेदवारांसाठी वयोगटाच्या कमाल मर्यादेत ५ वर्षांची वाढ करण्यात आली आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची वाढ करण्यात आली आहे. वयोमर्यादेची संपूर्ण माहिती अधिकृत नोटफिकेशनवर देण्यात आलीय.

नोकरीसाठी उमेदवारचं कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसंच उमेदवारानं मायनिंग इंटर्नशिप सर्टिफिकेट किंवा इतर निर्धारित योग्यता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. या पदावर नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरमहा ३१,८५२ रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळ http://easterncoal.gov.in यावर भेट द्यावी. अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख १० मार्च २०२२ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here