बहीण-भावाप्रमाणेच पृथ्वीला वृक्षांची नितांत गरज..!

0

 

लोकशाही विशेष लेख

ज्याप्रमाणे बहीणीला भावाची गरज आहे. त्याचप्रमाणे आज पृथ्वीमातेला आपली सर्वांची गरज आहे. त्यामुळे भाऊबीज या निमित्ताने पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रत्येकांनी वृक्षलागवडीकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. बंधुत्व टिकून राहण्यासाठी भाऊबीज ओवाळणीचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. भारतीय संस्कृतीत संपूर्ण सणांना आगळे-वेगळे महत्व दिसून येते. आठवीच्या सनापासुन दिवाळीची चाहूल सर्वत्र लागते आणि आठवड्याभरातच दिवाळीला प्रारंभ होतो व लक्ष्मीपूजन येते व संपूर्ण भारतात दिवाळीचा आनंद मोठ्या प्रमाणात दिव्याप्रमाणे प्रज्वलित होतो.

लक्ष्मी पुजनानंतर कार्तिकला सुरूवात होते. कार्तिकच्या प्रथमेला बलिप्रतिपदा येते. आपण त्याला दिवाळीचा पाडवा म्हणतो, गाईगोधन, गोवर्धन पुजा अश्या अनेक नावांनी या सणाला महत्त्व देवुन पुजाअर्चना करतो. या दिवशी शेतकरी बांधव गाई-मशीची आंघोळ करून पुजाअर्चना करतात. कारण यामुळे मुक्या जनावरांमध्ये सुध्दा उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे हा सर्वांचा उद्देश असतो. कारण मानव कीतीही हुशार आणि बुद्धीजीवी प्राणी असला तरीही त्याला अनेक कठीण प्रसंगी मुक्या प्राण्याचा सहारा घ्यावाच लागतो. त्यांना मानव परिवारापासुन कदापी वेगळे करता येत नाही. कारण मानवांच्या आहारामध्ये सर्वात मोठा वाटा गाय, म्हैस इत्यादी सह अनेक प्राण्यांचा आहे. दही, दुध, तुप, लोनी आणि यापासून अनेक व्यंजन युक्त पदार्थ ही गाई-मशींच्याच दुधापासून बनत असतात. त्याचप्रमाणे गाई-मशीच्या शेणापासून खत तयार होते व यांचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजेच गाय, म्हैस किंवा अन्य पाळीव प्राणी हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व सुरक्षिततेच्या दृष्टीने ढालच आहे.

मुक्या प्राण्यांमुळेच शेतीची मशागत होते व यातुनच अन्नधान्य निर्माण होते आणि आपल्या पोटाची खळगी भरते. कार्तिक व्दितीया म्हणजे भाऊबीज या सणाला भारतात आगळेवेगळे महत्व आहे. कारण भाऊ बहिणीपासुन कितीही दुर असला तरी या सणाचा कधीच विसर पडत नाही. भाऊबीजेला सर्वत्र अक्षवाणाचा कार्यक्रम होतो. परंतु भाऊ-बहिण जर काही कारणास्तव भाऊबीज या दिवशी जरी अक्षीद लावु शकली नाही तरी यांचे मीलन हे कार्तिक पौर्णिमेपर्यंत किंवा नागदिवाळीपर्यंत अक्षीद लावता येते. कारण बहिण-भाऊ यांचं नाते अतुट रहावे हाच यामागचा मुख्य उद्देश असावा व देवाने ओवाळणीचा कालावधी वाढविला असावा असे मला वाटते. म्हणजेच भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला आगळीवेगळे महत्व अवश्य दिसून येते. कारण या संपूर्ण सणांवरून लक्षात येते की भारतीय संस्कृतीची एकच परीभाषा आणि उद्देश आहे तो म्हणजे बंधुत्व टिकून ठेवने. दिवाळी हा सण आला म्हणजे आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते. म्हणून बहीण भाऊ यांचा सण म्हणजेच भाऊबीज असेही माणल्या जाते.

आपण भाऊबीज हा सण मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करतो यात दुमत नाही. परंतु यावर्षी आपला देश ७७ वर्षं पूर्ण झाल्यामुळे भाऊबीज या सणाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होने गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भारतासह संपूर्ण जगात प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे व प्रदुषणाच्या बाबतीत भारत सध्या रेडझोनमध्ये आहे. परंतु मानव बुद्धीजीवी प्राणी आहे त्यामुळे यावर आपणच आवर घालू शकतो. याकरीता भाऊबीज या सणाचे औचित्य साधून बहीणीने भावाला व भावाने बहिणीला एकतरी झाड भेट दिले पाहिजे. यामुळे भाऊबीज हा सण साजरा होईलच परंतु बहीण-भावाच्या आगळ्यावेगळ्या नात्यांमध्ये झाडांसोबत सुध्दा प्रेम वाढेल आणि ही आठवण अनंत काळपर्यंत अबाध्य राहिल व मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्याचे आपल्याला दिसुन येईल. यामुळे आपण अनेक जीव जंतू, पशु-पक्षी व मानव यांचे प्राण वाचवीसाठी मोठी मदत मिळेल. त्याचप्रमाणे पृथ्वीचे संतुलन टिकवण्यासाठी बहीण-भावाचा मोठा वाटा आपल्याला दिसुन येईल.

भाऊ बहिणीचे पवित्र नातेसंबंध अतुट रहावे आणि रहाले पाहिजे. कारण बहिण भावाला जेव्हा ओवाळते तेव्हा ईश्वराजवळ त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते व बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुत्व टीकावे अशी अपेक्षा करते. भाऊबीजेच्या निमित्ताने बहिण भावाला व भाऊ बहिणीला वस्तूंच्या रूपात काहीतरी भेटवस्तू देत असते ती दिसलीच पाहिजे सोबतच एक वृक्ष सुध्दा दिले पाहिजेत. कारण बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा हा सण आहे. त्यामुळे सर्वांनीच वृक्षलागवडीकडे जातीने लक्ष द्यायला हवे. यामुळे गुरांना चारा व संपूर्ण प्राणीमात्रांना शुद्ध हवा, ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल. निसर्ग सुरक्षित तर पृथ्वी सुरक्षित, पृथ्वी सुरक्षित तर संपूर्ण जीवजंतू-पशु-पक्षी व आपण सुरक्षित हा मुलमंत्र भाऊबीज या निमित्ताने सर्वांनीच अंगीकारला पाहिजे. या निमित्ताने निसर्गाचे संगोपन होईल हीच भाऊबीजेच्या निमित्ताने आग्रहाची विनंती.

 

रमेश कृष्णराव लांजेवार

माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर

मो. ९९२१६९०७७९

Leave A Reply

Your email address will not be published.