भारत ई-कचरा निर्मिती करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पर्यावरणाच्या सर्व समस्या उपभोगवादाशी संबंधित आहे. पृथ्वीवरील स्रोतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कचऱ्याचे प्रमाणातही वाढ होत आहे. जगात प्लास्टिक कचरा निर्माण करण्यात भारताचा पाचवा तर, ई-वेस्ट तयार करण्यात तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदलाच्या माजी सल्लागार संचिता जिंदल यांनी दिली.

एल.ए.डी. आणि श्रीमती आर.पी. महिला महाविद्यालयात शनिवारी ‘ग्रीन अर्थ-क्लीन अर्थ’ विषयावर राष्ट्रीय परिषदेतील ‘वेस्ट मॅनेजमेंट फॉर क्लीन अँड ग्रीन अर्थ’ विषयावर बोलत होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, विमेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ. पूजा पाठक, उपप्राचार्य डॉ. किरण पाटील व डॉ. रिजूता बापट, संयोजक डॉ. दीपाली चहांदे यांची उपस्‍थ‍िती होती.

शाश्वत कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, ‘टेक-मेक-मेक’ हे आर्थिक चक्र फायदेशीर हरू शकते असे सांगत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे सुरु असलेल्या विविध पर्यावरण संवर्धन विषयक योजनांची माहिती जिंदल यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.