different christmas gift ideas for boyfriend home goods gift cards at cvs marlboro mobile coupons not working ramada philadelphia airport parking coupon
Thursday, December 1, 2022

गोदामातील कापसाच्या गाठी आगीत खाक

- Advertisement -

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क : येथील खरेदी-विक्री संघाच्या खासगी व्यापार्‍याला भाडेतत्वावर दिलेल्या गोदामाला रात्री लागलेल्या भीषण आगीत ढेप आणि कापसांच्या गाठीसह अन्य सामग्री जळून खाक झाली आहे.
शेंदुर्णी येथे काल रात्री दहा वाजेच्या सुमारास सहकारी खरेदी-विक्री संघाच्या भाडेतत्त्वावर दिलेल्या गोदामाला भीषण आग लागली. काही मिनिटांमध्येच या गोदामातून आगीचे मोठे लोळ दिसू लागल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बघता-बघता आगीने भीषण स्वरूप धारण केले. यानंतर नागरिकांनी स्वत: आग विझवण्याचा प्रयत्न केला तरी यात यश आले नाही. दरम्यान, अग्नीशामन दलाच्या पथकाने प्रयत्नांची मोठी शर्थ करून आगीवर नियंत्रण मिळविले.
या भीषण आगीत ढेपसह कापसाच्या गाठी व इतर साहित्य व यंत्र जळून खाक झाली असून यात लाखो रूपयांची वित्तहानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधीत सहकारी संस्थेचे गोदाम पवन राजमल अग्रवाल व राजमल अग्रवाल यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. या गोदामात त्यांनी ढेप आणि इतर व्यापार्‍यांनी कापसाच्या ठेवलेल्या गाठी या आगीत भस्मसात झाल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या