Friday, December 9, 2022

गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहतात..

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

आज मोठ्या थाटात आणि जल्लोषात गणरायाचे आगमन होत आहे. हिंदू धर्मानुसार पूजाविधी करून गणरायाची स्थापन केली जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. त्यातच २१ दुर्वांची जुडी गणपतीला का वाहिली जाते, यामागचं कारण आणि आख्यायिका आपण जाणून घेऊया..

- Advertisement -

..म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात

- Advertisement -

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दुर्वा वाहिल्याने गणपती प्रसन्न होतो. गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत. एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाले होते. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

दुर्वा ही एक औषधी वनस्पती

तसेच दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

दुर्वा वाहतांना कोणता मंत्र जपावा

ॐ गणाधिपाय नमः, ॐ उमापुत्राय नमः, ॐ विघ्ननाशनाय नमः, ॐ विनायकाय नमः

ॐ ईशपुत्राय नमः, ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः, ॐ एकदन्ताय नमः, ॐ इभवक्त्राय नमः

ॐ मूषकवाहनाय नमः, ॐ कुमारगुरवे नमः

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या