दुर्गा विसर्जनाला गालबोट, 100 जण वाहून गेल्याची भीती (व्हिडीओ)

0

पश्चिम बंगाल, लोकशाही न्यूज नेटवर्क

दुर्गाविसर्जनाचा (Durga Visarjan) उत्सव देशभरात साजरा होत आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गाविसर्जनाला गालबोट लागला असून मोठी दुर्घटना घडली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) जलपायगुडी येथील माल नदीला अचानक आलेल्या पूरामध्ये जवळपास 100 जण वाहून गेल्याचं समोर आलं आहे. रात्री उशिरापर्यंत 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एनडीआरएफची टीम (NDRF Team) आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

https://twitter.com/Vikram_Tub/status/1577705657817784320?s=20&t=i9qcIlg7ietHFwGvsg8iIQ

माल नदीत (Mal River) दुर्गा विसर्जनासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. विसर्जनादरम्यान अचानक माल नदीला पूर आला. घटनेच्या वेळी विसर्जनासाठी माल नदीच्या काठावर शेकडो लोकांनी गर्दी केली होती. नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे अनेक दुर्गाभक्त वाहून जाऊ लागले. पाण्यात वाहून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरडा केला.

जलपाईगुडीचे एसपी देवर्षी दत्ता यांनी या घटनेला दुजोरा दिला. देवर्षी यांनी सांगितले की, ‘दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शकता आहे. आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमध्ये 10 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पूरामध्ये 100 पेक्षा अधिक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बऱ्याच जणांचा जीव वाचवण्यात यश आला आहे. बेपत्ता झालेल्या इतर जणांचा शोध सुरु आहे.

जलपाईगुडीच्या जिल्हा दंडाधिकारी मोमिता गोद्रा यांनी सांगितले की, ‘अचानक आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले. आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आम्ही जवळपास 50 जणांचे प्राण वाचवले आहे. शोधमोहिम आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.