डियुपीएमसी संघ ‘पायरेक्सीया ट्रॉफी’चा विजेता
जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डियुपीएमसी संघाने आयोजित ‘पायरेक्सीया’ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट लीग स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी बार्शी येथील नर्सिंग महाविद्यालयाचा ६ गडी राखून पराभव करत चषकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचे आयोजन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, प्रा. पियुष वाघ, रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत एकूण ४० संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामना प्रकाशझोतात खेळवण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
अंतिम सामन्यात डियुपीएमसी संघाने उत्कृष्ट खेळी करत बार्शी नर्सिंग महाविद्यालयाला सहज पराभूत केले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यश पाटीलउत्कृष्ट फलंदाज म्हणून चेतन पाटील यांना सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते, ज्याचा हजारो प्रेक्षकांनी ऑनलाईन आनंद घेतला.